**************पोस्टमन *******************************
एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा.
एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, *"पोस्टमन ssssss"*
आतून एका मुलीचा आवाज आला,. *"जरा थांबा, मी येतेय.."*
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, *"कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे.."*
आतून मुलीचा आवाज आला, *"काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते.."*
पोस्टमन, *"तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल."*
पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. _दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती._ काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.
असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज _पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय._ ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर _दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले._ नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन _एक सुंदर चप्पल_ जोड खरेदी केली.
रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे _"दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी)_ मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? _बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे._ पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून _त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले._
दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, *" मला फंडातून कर्ज हवे आहे"*
साहेब म्हणाला, *"अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?*
पोस्टमन म्हणाला, *"मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."*
साहेब : *"पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?*
पोस्टमन : *"साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे."*
साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!_
सारांश....
*_नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही..!तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही ******************************************************************************
*जीवनात सजीवाची उपयुक्तता*
=================
कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी जाळे विणणारा कीटक, हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.
*तात्पर्य*:
*जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वतःला कमी समजू नये.प्रत्येकाचे आपआपल्या परीने कार्य व महत्त्व वेगवेगळ्या स्वरुपात महत्त्वाचे असते.*******************************************************************
*बोधकथा*
" काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काही व्यापारी नावेतून जात असतात. नावेतून प्रवास करीत असताना अचानक समुद्रात वादळ घोंघावू लागते. तेव्हा वादळ इतके जोरात येते की त्याची नाव टिकाव धरू शकत नाही. शेवटी नाव बुडते. व्यापारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतात.
व्यापाऱ्यांची , जीव वाचवण्यासाठी चाललेली घालमेल, त्यांचे प्रयत्न पाहून एक कासव त्यांना मदत करण्याचे निर्णय घेते . कासव व्यापाऱ्यांजवळ जाते. कासव त्यांना स्वतःच्या पाठीवर बसण्यास सांगते. ते व्यापारी त्याच्या पाठीवर बसतात. कासव त्यांना किनाऱ्यावर सुखरूप आणून सोडते इतक्या मोठ्या संकटात मदत केल्याबद्दल व्यापारी कासवाचे आभार मानतात.
थोड्या वेळाने व्यापाऱ्यांना खूप भूक लागते. अन्न कसे मिळवायचे याची ते चर्चा करतात. ते इकडे तिकडे खाण्यासाठी काही शोधू लागतात. त्याचं हे बोलन ऎकुन कासवाला वाईट वाटते. कासव त्यांना म्हणतो कि 'तुम्ही खाद्य म्हणून मला खाऊ शकता.'
कासवाचे असे बोलणे ऐकून व्यापाऱ्यांना वाईट वाटते आणि ते त्याला म्हणतात 'तू आमचा जीव वाचवला आहेस. आम्ही तुला नाही मारू शकत.' अशाप्रकारे ते कासवाचा निरोप घेऊन तेथून निघून जातात.
*तात्पर्य -*संकटकाळी दुसर्यांना मदद करावी.
***********************************************************
* *बोधकथा**
*अपमान आणि उपकार*-
एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो, "आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले". ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, "आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले". हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि, "पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला, "जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत *तात्पर्य*-माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.**************************************
---------------------------------------------------------------------------------
*सम्राट आणि साधू*
एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.
*तात्पर्य*
मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.
*********************************************************
------------------------------------------------------------------------------
*देवाचा मित्र*
एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.*************-********************
-----------------------------------------------------------------------------
*आजची बोधकथा*
" एका गावाच्या जवळ एक तळे होते. त्या तळ्यामध्ये एक हंसीण रहात होती. त्या तळ्याजवळच एक गरीब बाई आपल्या दोन मुलीं सोबत राहत होती. त्या हंसीणला सोन्याची पिसे होती. एके दिवशी हंसीणला वाटते की, आपण या गरीब बाईला सोन्याची पिसे देऊन मदत करूयात. आपण जर या बाईला मदत केली तर ती आणि तिच्या मुली आनंदाने राहतील.
दुसऱ्या दिवशी हंसीण त्या गरीब बाईला भेटायला गेली आणि म्हणाली, माझे एक सोन्याचे पीस मी तुम्हाला रोज देत जाईन. त्यानंतर हंसीण रोज त्यांना एक सोन्याचे पीस देऊ लागली. त्यामुळे ते कुटुंब सुखी झाले. कुटुंबाची परिस्थिती बदलली. आता ते आनंदाने राहू लागतात.
पुढे ती बाई लोभी बनली. ती ठरवते की एकदाची हंसीणची सर्व पिसे काढून घेऊयात. दुसऱ्या दिवशी ती बाई हंसीणला पकडते आणि पिसे ओढू लागते. पण अचानक त्या हंसीणच्या पिसांचे रंगरूप पालटते. पिसे सामान्य होऊन जातात. ते पाहून बाईला आश्चर्य वाटते.
हंसीण तिला म्हणते ' मी तुला मदत करण्याचे ठरवले होते पण तू हावरट झालीस. आता मी कधीही पुन्हा परत येणार नाही.' या बाईला आपली चूक उमगते आणि ती त्या हंसीणची माफी मागते. हंसीण तिला म्हणते 'पुन्हा कधी असा हावरटपणा करू नकोस' असे म्हणून ती उडून जाते.
*तात्पर्य -*माणसाने जास्त लोभी नसावे जे मिळते ते ही गमवून बसतो."
bhjcbnnnjbknnnknkjbjjbkb nh
.
. पेला होण्यापेक्षा तळं व्हावे
एकदा अनुभवी आणि वृद्ध गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते.
एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरुंनी त्या दु:खी तरुणाला त्यातील मूठभर मीठ एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगितले.
पाणी चवीला कसे लागले? गुरुंनी विचारले.
कडू असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.
गुरुंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मूठभर मीठ त्या तळ्यात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळ्याजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळ्यात मिसळ्यानंतर ते वृद्ध गुरू म्हणाले, आता या तळ्यातील पाणी पिऊन पाहा. त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळ्यावर गुरुंनी त्याला विचारलं, आता या पाण्याची चव कशी आहे?
ताजी आणि मधुर! शिष्याने सांगितले. आता तुला मिठाची चव लागतेय? नाही.
गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात हातात घेतला. ते म्हणाला, आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते.
आयुष्यातील दु:खही तेवढंच असतं, परंतु आपण ते दु:ख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबून असतो. म्हणून जेव्हा आपण दु:खात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवले पाहिजे. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तात्पर्य: दुःखात, संकटात आपल्या भावना व विचार व्यापक ठेवले पाहिजे.~*
--------------------------------------------------------------------------------
*ओझ*
❏❏❏❏❏❏❏❏❏❏❏❏❏
एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी १२ वाजले होते. रणरणत्या उन्हान बेजार केल होत.
एक साधू या मार्गागारून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्याच्या जवळ तो शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढच समान होत. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं समान ओझं वाटत होत, आणि घामाच्या धारा त्यांच्या अंगावरून वाहत होत्या.
थोडं पुढ गेल्यावर त्याला एक ७० वर्षाची आदिवासी महिला ८ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उपचारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
साधून त्या महिलेला विचारलं,
"आजी इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही ही उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे."
त्या वृद्धेन साधूना नीट निरखून पाहिलं, आणि म्हणाली,
"महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे!"
तात्पर्य खऱ्या प्रेमानं केलेल्या गोष्टीच ओझ वाटत नाही~🌺🌺
******************************************
*आरसा*
एक गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा दर्पण असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दुख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्त्यात भेटणा या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंतकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दुखी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वतचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’
*तात्पर्य*
आपण नेहमीच दुस या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
Parable=बोधकथा
The Pleasure of Freedom :
Once in a jungle a beautiful golden bird had made her home on a tree. When she sang, shiny pearls fell from her open beak.
One day a bird catcher came to the jungle. Soon he spread a net and the poor golden bird was caught in it. The bird catcher took the bird home and kept it in a silver cage and fed it well. But the sad bird did not sing at all and the hunter never got any pearls.
The bird catcher sold the caged bird to a merchant. The merchant gifted that golden bird to the king. The king thought, "Hmm ... that's a nice bird. I'll give it to the princess to play with."
So the king gave the caged bird to the princess.
She was a beautiful girl with a kind heart.
She at once freed the golden bird. The pleasure of freedom made the golden bird sing aloud and soon a shower of pearls fell in the room of princess.
The golden bird came to meet her everyday.
------------------------------------------------------------------
******The Correct Solution : *******-
Once, a king wanted to find a wise man to be his Prime Minister. So according to a plan, he made a riddle. "A man has a boat to cross the river. Only two can go in the boat at one time. The man has to take a lion, a goat and a bundle of grass to the other bank so that in a way no one will eat the other. What will he do?"
No one in the kingdom could give the answer. Then a young man went to the king and said, "Your Majesty, the man will take the goat to the other bank. Then he will go to get the lion. He will bring the lion to the other bank and take back the goat with him. Then he will take the grass to the lion because lion won't eat the grass. He will row back to get the goat to the other bank."
The king was amazed by his cleverness because he had never let the grass and the goat or the lion and the goat to be together.
So the king was sure of his intelligence and appointed him as the Prime Minister.
---------------------------------------------------------------------------------
Parable बोधकथा
Gain or Loss :
It was summer and there were many instances of power failures. Ramesh wanted to be prepared for this, so he went to a shop. He bought two candles. Each of them cost two rupees. When he gave a ten rupee note, the shopkeeper returned six rupees. There was a five rupee coin and two fifty paisa coins.
At home, there was no light. So Ramesh lit the candle but by chance he dropped a fifty paisa coin in the dark. He looked around but could not find the coin. Slowly the candle burnt to half but Ramesh was still busy looking for the coin. Gradually the candle was burnt out. So Ramesh lit the second candle too and kept looking for the coin. A few minutes later, the second candle was also burnt out and luckily Ramesh recovered the coin.
But to gain the fifty paisa Ramesh had burnt out candles worth four rupees. He wondered if he had gained a coin or lost some money.
We must be careful to take decisions which do not cause us loss in anyway.
************************
No comments:
Post a Comment