टेक्नो टिप्स

     💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*आपण तयार केलेली PDF file पासवर्ड प्रोटेक्टेड कशी करावी*
*मित्रहो* , 
*आपण जेव्हा एखादी PDF फाईल तयार करतो आणि संगणकामध्ये साठवून ठेवतो तर ती माहिती सहज कोणीही ओपन करून वाचू शकतो* 

*पण ही PDF फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड असेल तर आपल्याला माहित असलेला पासवर्ड वापरून ती ओपन होऊ शकतो*

*PDF फाईल कशी पासवर्ड प्रोटेक्टेड करावी हे पाहूया (खालील कृती MS office 2010 ) मध्ये किंवा त्यापुढील वर्जन मध्ये करू शकता* 

*सर्व प्रथम ms word ओपन करून त्या  मध्ये आपल्याला हवा असेलेला मजकूर किंवा images add करा*

*डाव्या बाजूला वर कोपऱ्यात file वर क्लिक करा*

*त्यातील save as वर क्लिक करा* 

*आता एक पॉप ऑप विंडो ओपन होईल* 

*त्यात खाली File name मध्ये फाईल चे नाव टाका* 

*save as type मध्ये दिलेल्या लिस्ट मधून PDF निवडा* 

*त्याच्या खाली एक बॉक्स मध्ये options असे असेल त्याच्यावर क्लिक करा , एक पॉप ऑप विंडो येईल , त्यात सर्वात खाली Encrypt the document with password  असा पर्याय असेल त्याच्या समोर बॉक्स मध्ये क्लिक करा तेथे चेकमार्क येईल , त्यानंतर खाली ok च्या बटनावर क्लिक करा* 

*आता एक पॉप ऑप विंडो येईल त्यात कोणताही सहा ते बत्तीस वर्णांचा पासवर्ड तयार करून दोन वेळा type करा व खाली ok च्या बटनावर क्लिक करा*

*आता सुरुवातीला save करण्यासाठी जी विंडो आली होती ती ओपन होईल त्याच्यात खाली उजव्या बाजूला save बटनावर क्लिक करा* 

*अशा प्रकारे PDF फाईल तयार झालेली असेल ती पासवर्ड प्रोटेक्टेड असेल ही फाईल my documents मध्ये save झालेली असेल*

*ही फाईल ओपन करायची असल्यास आपण टाकलेला पासवर्ड टाकूनच ओपन करता येईल*

*धन्यवाद*


💢💢💢    1.*आपल्या संगणकाची स्क्रीन पासवर्ड ने lock करणे .

*मित्रहो*
*आपण आपल्या संगणकामध्ये आपली खूप माहिती जतन करू ठेवतो पण हाच संगणक दुसऱ्याने आपल्या नजर चुकीने हाताळला तर आपली माहिती दुसरा व्यक्ती चोरून घेऊ शकतो , त्यासाठी आपल्या संगणकाची स्क्रीन जर पासवर्ड ने लॉक असली तर कोणीही आपल्याला माहिती असलेला पासवर्ड  स्क्रीन वर  टाकला नाहीतर संगणक ओपन शकत नाही*

 *संगणकाला पासवर्ड ने लॉक करण्यासाठी खालील कृती करा*

 *सर्वप्रथम आपल्या संगणकाच्या control panel मध्ये जा*

*यात Control accounts and family safety हा पर्याय असेल त्यातील Add or remove user accounts  वर क्लिक करा*

 *येथे आपला user account असेल त्याच्यावर क्लिक करा नसेल तर Create new account हा पर्याय असेल तेथे नवीन user account तयार करून त्याच्यावर क्लिक करा*

 *येथे नवीन स्क्रीन ओपन होईल त्यात create a password असा दुसरा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा*

 *आता परत नवीन स्क्रीन येईल तेथे new password मध्ये आपल्याला हवा तो पासवर्ड तयार करून टाका व खाली confirm पासवर्ड वर तोच पासवर्ड टाका*

 *आता खाली create password वर क्लिक करा*

*अशा प्रकारे आपल्या संगणकाची स्क्रीन password ने लॉक झाली असेल*

 *जेव्हा जेव्हा आपण संगणक नव्याने सुरु करू तेव्हा स्क्रीन सुरु होण्यासाठी पासवर्ड मागेल , दुसऱ्याला पासवर्ड माहिती नसेल तर तो संगणक सुरु करू शकत नाही*

*हा जो पासवर्ड टाकाल तो व्यवस्थित आठवेल असा ठेवा कारण पासवर्ड विसरल्यास  परत संगणक सुरु करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागते*

 ------------------------------
*आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात* 

*पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो* 

*या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे* 

*आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील* 

*१ ) संगणकावर setting करणे* 

*सर्व प्रथम युट्युब ओपन करा* 

*आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा* 

*Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा* 

*आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on  या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल*

*सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा* 

*अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो* 



*२ ) मोबाईल वर setting करणे* 

*सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा* 

*स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा* 

*सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा* 

*आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा* 

*सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल* 

*आता back या अशा प्रकारे मोबाईलवर  restricted mode ऑन झाला असेल* 

*या settings करून आपण सुमारे ९५% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त  वापरू शकतो* 

                *धन्यवाद*
--------------------------------------------------------
2.*कॉम्प्युटरचा स्पीड वाढण्यासाठी कॉम्पुटर क्लीनअप कसा करावा*



आपला कॉम्प्युटर बरंच काळ वापरला तसेच नवीन नवीन अप्लिकेशन इन्स्टॉल केले व री सायकल बिन मधील डाटा व टेम्पररी फाईल्स वेळचे वेळीस डिलीट केल्या नाहीत तर संगणकात बिनकामाच्या फाईल्सची संख्या वाढून कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
त्यासाठी......

1⃣प्रथम माय कॉम्प्युटर ओपन करणे.

2⃣यातील एक ड्राइव्ह डिस्क क्लीनअप साठी निवडावा.

3⃣त्यावर राईट क्लिक करून प्रोपर्टीवर क्लिक करणे.

4⃣त्यानंतर ओ एस प्रोपर्टीमधील डिस्क क्लीनअप या बटणावर क्लिक करावे.

5⃣त्यानंतर थोडा वेळ प्रोसेसिंग चालू राहील त्याद्वारे कॉम्प्युटर मधील नको असलेल्या फाईल शोधल्या जातात.

6⃣अशा फाईल डिस्क क्लीनअप मध्ये दाखवल्या जातील तेथील सर्व चेक बॉक्स वर क्लिक करणे.

7⃣नंतर ओके या बटणावर किल्क करणे.याद्वारे नको असलेल्या सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.तसेच री सायकल बिन मधील सुद्धा सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.

8⃣ यामुळे कोणत्याही महत्वाच्या file delect होत नसून टेम्पररी file नष्ट होतात।
---------------------------------------------------
3. 🔰 *मोबाइल फोन को बनाइये माउस* 🔰

अलग से माउस कैरी करना मुसीबत लगता है? तो आप अपने मोबाइल फोन को ही माउस की तरह यूज कर सकते हैं।

जी हां, रिमोट माउस नाम के ऐप के जरिये आप अपने आईफोन या ऐंड्रॉयड फोन को एक माउस में तब्दील कर सकते हैं। यानी अपने मोबाइल फोन से अपने कम्प्यूटर या लैपटॉप को कंट्रोल कर सकते हैं।

इसके लिए ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है। इस ऐप को अपने फोन में इन्स्टॉल करें। ऐप को डाउनलोड करने के बाद www.remotemouse.net पर जाएं और अपने लैपटॉप/मैक/डेस्कटॉप पर रिमोट माउस सर्वर इन्स्टॉल करें और एक ही वाई-फाई नेटवर्क से अपने लैपटॉप और फोन को कनेक्ट करें। जब मोबाइल ऐप आपका कम्प्यूटर स्कैन कर ले, तो उसे कनेक्ट कर लें। बस, हो गया।

इसके अलावा भी रिमोट माउस ऐप्स कई सारे फीचर्स देता है। आप न सिर्फ इस ऐप के जरिये अपने फोन को माउस में, बल्कि टचपैड या की-बोर्ड में भी बदल सकते हैं। इस ऐप के जरिये आप फोन को रिमोट की तरह यूज करते हुए कम्प्यूटर या लैपटॉप पर विडियो भी प्ले/पॉज़/रिवाइंड/फॉरवर्ड कर सकते हैं।

www.remotemouse.net पर जाकर आप इस ऐप को अपने ऐंड्रॉयड या आईओएस डिवाइस के लिए डाउनलोड कर सकते है .
------------------------------------
4.*मोबाईलची स्क्रीन लॅपटॉप व pc ला घेऊया*💻

*♦कुठलेही नेट connection न वापरता♦*

🎯 *लॅपटॉप ला mirror करणे*

▶ *playstore वरून airdroid हे app मोबाईल वर इन्स्टॉल करावे.*

▶ *आता मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.*

▶  *मोबाईल च्या सेटिंग मधील more या मधील tethering portable hotspot चालू करावे.*

▶ *आता लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबत connect करावे.laptop ला हा connection tap taskbar वर असतो.*

▶ *मोबाईल ला कनेक्ट झाल्यावर आता airdroid अँप ओपन करावे.*

▶ *app मध्ये *airdroid web* या टॅब खाली 192.168.असा नंबर address दिसतो .
*तो लक्षात ठेवावा किंवा* 

▶लॅपटॉप च्या *browser* मध्ये ( *google chrome*/ *firefox*)
Address बार मध्ये type करावा

▶ *आता address type केला की लॅपटॉप वर enter दाबावे.*

▶ *मोबाईल वर accept किंवा decline हा मेसेज येईल .*

▶ तेथे *accept* करावे,
*File,app screenshot असा display लॅपटॉप वर दिसेल.*

▶ *त्यापैकी screenshot वर clik करावे,*
मोबाईल वर *start now* असा मेसेज येईल त्याला *start* करावे.

▶ *तुमचा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल.*

▶ *full screen साठी option symbol select करावा.*

▶ *आता airdroid app मधून back येताना exit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit no म्हणावे.*

▶ *मग इतर स्क्रीन,अँप्स वापरण्यासाठी home button ने back यावे.*

🙏 *अशा पद्धतीने तुमचा 📲 लॅपटॉप 💻ला mirror झालेला असेल🙏*

▶ *अजूनही आपण इंटरनेट चालू केलेले नाही.🙂*

▶ *परंतु नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व function वापरा.*

🎯🖥*Table pc साठी हीच पद्धत वापरता येते*🖥


🖥 *फक्त pc ला wifi port नसते म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत घ्यावे लागेल म्हणजे आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने कनेक्ट करता येईल.*
---------------------------------------------
*Internet वरील Adult वेबसाईट बंद कशा कराव्यात.*

*नमस्कार मित्रांनो , हल्ली आपली मुलं इंटरनेट चा  वापर  करतात . इंटरनेट वरील Adult वेब साईट चा वापर हा पालकांच्या दृष्टीने काळजीचा विषय असतो. मुलांना इंटरनेटवर सुरक्षित ठेवणे खुप किचकट काम असु शकते. मुलांवर इंटरनेट वापरत असतांना लक्ष ठेवणे आणि त्यांचा इंटरनेट वापर ट्रॅक करणे शक्य नाही.*

*पण आता खालील सोप्या पध्दतीने आपण Adult साईटस ब्लॅाक करु शकतो*

जर तुमच्या कॉम्प्युटरवर विंडोज 7 असेल तर पुढील स्टेप्स कराव्यात -

1⃣ *Start बटनावर क्लिक करावे > Control Panel > Network and Internet > Network and Sharing Center.येथे Local Area Connection वर क्लिक करावे.*

2⃣ *आता स्क्रिनवर एक विंडो आलेली असेल.येथे Properties या बटनावर क्लिक करावे.*

3⃣  *स्क्रिनवर Local Area Connection Properties ची विंडो ओपन होईल.येथे Internet Protocol Version 4 (TCP/IPv4) यावर क्लिक करावे आणि नंतर खालील बाजुला असलेल्या Properties या बटनावर क्लिक करावे.*

4⃣ *येथे Use the following DNS server addresses हा ऑप्शन सिलेक्ट करावा. आणि येथे खालील प्रमाणे DNS दयावे. Preferred DNS Server: 208.67.222.222*
*Alternate DNS Server: 208.67.220.220*

5⃣ *शेवटी OK बटनावर क्लिक करावे.*
---------------------------------------
*8 सर्वोत्तम अँड्रॉइड अँप्स ज्याद्वारे तंत्रस्नेही शिक्षकांना स्वतःला सर्वोत्तम ज्ञान मिळवता येईल*

*Mlearning* म्हणजेच मोबाईल learning हे आता काळाची गरज झालेय. आतापर्यंत आपण खूप छान असे तंत्रस्नेही प्रशिक्षण घेतलय पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली नाहीत. अँड्रॉइड अँप्स आपल्याला या प्रश्नांची उत्तरे देऊन समृद्ध करतील. या अँप्स मधील कोर्सेस आपल्याला ट्रक भरून व्हिडिओस देतात ज्यात कॉम्पुटर प्रोग्रामिंग व अन्य कोडींग तसेच music व्हिडिओस नवीन तंत्र माहिती याचा खजिना आहे जो शिक्षकाला एक प्रोफेशनल म्हणून समृद्ध करतो.चला तर आवडेल तो कोर्स निवडा व पाहिजे तेव्हा शिका व बना एक जागतिक स्तरावरील प्रोफेशनल....

👨🏻‍💻1) Edx - edx 

तुम्हाला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या कोर्सेस ला डायरेक्ट ऍक्सेस मिळवून देतो. तर शिका हॊवर्ड mit uc बर्कले या विद्यापीठातील तंत्र कोर्सेस तेही एका क्लिक वर.यात तुम्हाला कॉम्पुटर science मानसशास्त्र आहार माहिती नियोजन अंकशास्त्र संख्याशास्त्र व अशा हजारो कोर्सेस ची यादी मिळते.

👩‍💻2) coursera

हे अँप सुद्धा जगातील सर्वोत्तम कोर्सेस तुम्हाला पूर्ण करण्याची संधी देते. ज्यात संगीत व फोटोग्राफी विशेष कोर्सेस उपलब्ध आहेत.

👨🏻‍💻3) Udemy

उडेमी हे एक असे जागतिक व्यासपीठ आहे जिथे 13 लाख विद्यार्थी स्व अध्ययन करत आहेत आणि 40 हजार पेक्षा जास्त कोर्स तिथे उपलब्ध आहेत.इथे तुम्हाला त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात.

👩‍💻4) Lynda-online learning

तुम्हाला नेतृत्व विकसन शिकायचे असेल नाहीतर तुम्हाला एखादे अँप बनवायचे असेल किंवा एखादे software कसे काम करते हे पहायचे असेल. यात 3d animation पासून ग्राफिक design पर्यँत सर्व कोर्स आहेत.

👨🏻‍💻5) TED

टेड च्या माध्यमातून तुम्हच्या उत्सुकतेचा नवीन मार्ग दाखवा. 2000 पेक्षा जास्त एक्स्पर्ट टेड talk तुम्हाला इथे पाहायला मिळतात. भविष्यातील तंत्राची झलक पाहून तुम्ही विस्मयचकित व्हाल.

👩‍💻6) Treehouse

ट्री house एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वेब डिजाईन पासून html css , mobile development through coding apps, java iphone apps, php and python व व्यावसायिक कौशल्य. हे सर्व शिकता येईल तेही मोबाईल मध्ये.

👨🏻‍💻7) -Udacity- Learn programming
बेसिक ते ऍडव्हान्स प्रोग्रामिंग शिकण्याचे हक्काचे ठीकाण हे वरील अँप आहे. व हे तुम्हाला फेसबुक व तत्सम मोठ्या tech कंपनीत काम करणारे तज्ज्ञ हे शिकवतात.

👩‍💻8) Linkedln Learning

नेतृत्व व्यापार कौशल्य व इतर तंत्र कौशल्य शिकण्यासाठी हे अँप उपयोगी आहे. प्रोग्रामिंग पासून 3d animation पर्यँत सर्व काही शिकता येईल.


चला तर मग शिकुया ह्या अँप्स च्या मदतीने....
---------------------------------------------
ऑनलाइन सुरक्षिततेसाठी..
👭👭☝🏼👭👭👭☝🏼👭👭


इंटरनेट आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. बहुतांश जणांच्या हातात स्मार्टफोन खेळू लागल्याने त्याद्वारे ते २४ तास इंटरनेटशी जोडलेले असतात. याशिवाय सोशल मीडिया, विविध संकेतस्थळे, कम्युनिकेशन अ‍ॅप्स या माध्यमांतून स्मार्टफोनचा वापर न करणाऱ्यांचाही इंटरनेटवर राबता असतोच. त्यातच अलीकडे ‘डिजिटल वॉलेट’, ‘इंटरनेट बँकिंग’ यांचा वापर करण्याकडे ओढा वाढू लागल्याने वापरकर्त्यांची ‘ऑनलाइन सुरक्षा’ कळीचा मुद्दा ठरत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. स्मार्टफोन हे त्यातील महत्त्वाचे कारण असले तरी, संगणकाची आणि इंटरनेट सेवेची सहज उपलब्धता हेदेखील तितकेच महत्त्वाचे कारण आहे. मुंबईसारख्या मोठय़ा शहरांत तर मोफत वायफाय सुविधेमुळे इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत ‘ऑनलाइन सुरक्षा’ अतिशय महत्त्वाची ठरते. विशेषत: इंटरनेटवर सक्रिय असताना वापरकर्त्यांची माहिती चोरली जाण्याची किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्याची फसवणूक होण्याची शक्यता दाट असते. अनेकदा फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून तुमची माहिती विविध जाहिरात कंपन्या किंवा उत्पादन कंपन्यांकडे जमा होते. या माहितीचा गैरवापर होण्याची भीती नाकारता येत नाही. अशा अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. त्यामुळे इंटरनेटवर आपली कोणती व किती माहिती सार्वजनिक होत आहे, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सुदैवाने, तुम्ही २४ तास ‘ऑनलाइन’ राहूनदेखील स्वत:ची खासगी माहिती आणि डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी काही साध्या, सोप्या परंतु परिणामकारक गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

पासवर्ड संरक्षण

‘पासवर्ड’ ही तुमच्या सर्वच इंटरनेट खात्यांची चावी आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील खाते असो की ई-मेलचे असो की नेटबँकिंगचे, प्रत्येक ठिकाणचा पासवर्ड हा इतरांच्या हाती पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सहजासहजी ओळखता येणार नाही, असा पासवर्ड ठेवला पाहिजे. अनेक जण आपल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट खात्यांना एकच पासवर्ड वापरतात. पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे जावे यासाठी हा प्रयत्न असतो. परंतु तो पासवर्ड इतरांना माहीत पडला तर तुमच्या अन्य खात्यांवरील माहितीही चोरली जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो पासवर्ड स्वतंत्र ठेवावेत. अनेक पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण जात असल्यास तुम्ही ‘पासवर्ड मॅनेजर’ अ‍ॅपचा वापर करू शकता. अशा अ‍ॅपमध्ये विविध पासवर्ड अतिशय गोपनीय पद्धतीने सुरक्षित साठवून ठेवले जातात.

द्विस्तरीय पडताळणी

शक्य असेल त्या वेळी तुमच्या विविध खात्यांच्या द्विस्तरीय पडताळणी अर्थात ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ पद्धतीचा फायदा घ्या. अशा व्यवस्थेमुळे अन्य व्यक्तींना तुमच्या खात्यांमध्ये घुसखोरी करता येत नाही. ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’चा सर्वात साधा मार्ग म्हणजे, इंटरनेट खात्याच्या पासवर्डखेरीज एक ‘व्हेरिफिकेशन कोड’ तुमच्या मोबाइलवर पाठवण्यात येतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी नवनवीन क्रमांक मिळतो व तुमच्या स्मार्टफोनवर येणारा क्रमांक कोणालाही समजू शकत नाही.

‘अनानिमोस ब्राऊजिंग’

अनेकदा तुमचे ‘जीमेल’ खाते सुरू असताना, ‘गुगल सर्च’ वा अन्य कोणत्याही संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या ईमेलसोबत तुमची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी जमा होते. विशेषत: ‘गुगल सर्च’ अशी माहिती साठवून घेत असते. वापरकर्त्यांच्या आधीच्या ‘सर्च’नुसार त्याने मागितलेल्या माहिती पृथक्करण करून ती समोर आणणे, असा ‘गुगल सर्च’चा हेतू असतो. परंतु यामुळे वापरकर्त्यांची माहिती अन्य संकेतस्थळांनाही मिळते. त्यामुळे शक्यतो, ‘अनानिमोस’ अर्थात अज्ञात राहून इंटरनेट ब्राऊजिंग करा.

‘क्लीन अप’ करा

इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांना आपण भेट देतो, तेव्हा त्या संकेतस्थळांवर आपली माहिती जात असतेच; परंतु त्या संकेतस्थळावरील काही फाइल्स आपल्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर जमा होत असतात. यातील काही ‘कूकीज’ तुमच्या माहितीचा माग काढणाऱ्या हेरासारखे काम करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी इंटरनेट वापरानंतर किंवा किमान नवीन संकेतस्थळ हाताळल्यानंतर संगणक/ स्मार्टफोनवरील ‘कूकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाइल्स’ हटवून टाका. ‘सीसीक्लीनर’सारखे प्रोग्रॅम किंवा अ‍ॅप याकामी उपयुक्त ठरू शकतात.

‘अदृश्य’ राहा!

तुम्ही इंटरनेटवर ब्राऊजिंग करताना तुमची ओळख सार्वजनिक होऊ नये, यासाठी विविध ब्राऊजर्सवर सुविधा असते. गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’, फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड’ किंवा मायक्रोसॉफ्टच्या ब्राऊजरवर ‘इनप्रायव्हेट’ या नावांनी ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधा तुमच्या संगणकात शिरकाव करू पाहणाऱ्या ‘हेर’ कूकीजना रोखते. तसेच हे ब्राऊजर्स त्रयस्थ संकेतस्थळांकडून येणाऱ्या ‘कूकीज’नाही ‘ब्लॉक’ करतात.

दुसरीकडे या ब्राऊजर्सच्या माध्यमातून अनेक ‘अ‍ॅडऑन’ किंवा ‘एक्स्टेन्शन’ आपण वापरत असतो. असे ‘अ‍ॅडऑन्स’ प्रामुख्याने ‘जावा’, ‘फ्लॅश’ किंवा ‘सिल्वरलाइट’ यांच्या माध्यमातून कार्यरत असतात. परंतु अशा प्रोग्रॅमच्या माध्यमातून तुमच्या नकळत तुमची माहिती हाताळली जाते. त्यामुळे शक्यतो अश्या ‘अ‍ॅडऑन’ चा वापर टाळावा.
----------------------------------------
*🇮🇳आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय? नो टेन्शन...*

 _तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही... कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता._

*🎯कसे कराल बदल...🎯*


-  *https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा*

- _'✔Update Your Aadhaar Card' या टॅबवर क्लिक करा_

- *नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता... पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीनं... आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं...*

- ```'Fill up 4-Step Online Request' च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील Update Aadhaar Data या ऑप्शनवर क्लिक करा```

-  ```नवं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील... आणि त्यांची उत्तरंही...```

1) ```ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतील. व्यक्ती आपलं नाव, पत्ता, लिंग, जन्मदिवस, मोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात```

2) ```डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'click here' वर क्लिक करा```

3) ```अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.```

🛑  ```यानंतर तुम्हाला 'To submit your update/ correction request online please' च्या समोर  Click Here वर क्लिक करावं लागेल```

🛑 ```यानंतर उघडलेल्या 'Aadhaar Self Service Update Portal'वर तुम्ही पोहचाल. इथे तुम्हाला अगोदर 12 अंकांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.```

🛑 ```टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल```

🛑 ```यानंतर तुम्हाला तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यातील जी माहिती बदलायचीय त्यावर क्लिक करा```

🛑  ```Data Update Request उघडल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल```

🛑 ```सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसू शकेल... त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा```

🛑 ```सबमिट केल्यानंतर  Document Upload चा सेक्शन समोर दिसेल. इथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकाल```

🛑 ``` इथे तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं नाव सिलेक्ट करावं लागेल.```

🛑 ```यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मॅसेज मिळेल... या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकानं तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करू शकाल.```

*≡✽≡✽≡✽≡✧́✧≡✽≡✽≡✽≡✽≡
You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी उपाय 
You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.
पद्धत :- 1 (Method 1) वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.
आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...
तयार झालेला नवीन लिंक- https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :- 2 (Method 2)
मूळ लिंक- https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...
तयार झालेला लिंक- https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक- https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...
पद्धत :-4 (Method 4)
मूळ लिंक:- https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...
नवीन लिंक:- pwnyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
  यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...
पद्धत :-6 (Method 6)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl" टाइप करा जसे की...
नवीन लिंक-
वरील ट्रिक्स कसं वाटलं याबाबत खालील मेसेज बॉक्समध्ये लिहायला विसरु नका.

No comments:

Post a Comment